इस्रायल वेब सिरीज ‘फौडा’चा हिंदुस्थानात रिमेक बनणार

838

इस्रायल आणि पॅलेस्टाई संघर्षावर आधारित असलेली वेब सिरीज फौडा ही जगभरात जबरदस्त गाजली. या सिरीजचे आतापर्यंत तीन सिझन बनविण्यात आले असून त्यातील दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत तर तिसरा सिझन लवकरच येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरहिट ठरलेल्य़ा या इस्त्रायली वेब सिरीजचा आता हिंदुस्थानात रिमेक तयार करण्यात येणार आहे. मात्र यात इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष नाही तर हिंदुस्थान व पाकिस्तानातील संघर्ष दाखविण्यात येणार आहे.

‘फौडा’चा अरबी भाषेत ‘अंदाधुद’ असा अनुवाद होतो. सर्जिकल स्ट्राईक सारख्या कारवाईच्या वेळी अडचणी आल्यास किंवा गोंधळ झाल्यास ‘फौडा’ हा शब्द ‘कोड वर्ड’ म्हणून वापरला जातो. कंटेंट स्टुडिओ अ‍ॅपलॉज एंटरटेनमेंटने गुरुवारी याबाबतची घोषणा केली आहे. कंटेंट स्टुडिओने सांगितले की, फौडाचे निर्माते एस स्टुडिओशी आम्ही त्याच्या हिंदुस्थानात रिमेक करण्याबाबत करार केला आहे. ही सिरीज हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध दाखविण्यात येणार आहेत. संघर्ष आणि संघर्षाच्या जगात दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हिंसक क्रूर कृत्यामुळे अनेक निरपराध पीडितांच्या बळी जातो. याचीच गोष्ट फौडात सांगण्यात आली आहे.’ या वेब सीरिजच्या शूटिंगला 2020 मध्ये सुरवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या