
आरबीआयच्या संचालक मंडळात इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांची बँकेच्या संचालक मंडळावर बिगर-सरकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमानाथ यांचा हा कार्यकाळ 20 ऑगस्ट 2026 पासून पुढील चार वर्षांसाठी असणार आहे, तर आनंद महिंद्रा यांना सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली.






























































