
हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन केंद्राच्या (इस्रो) महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम-2 प्रोजेक्टमध्ये विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला असला तरी केंद्राला भविष्यकालीन योजनांबाबत अजूनही आशा आहेतच. लॅण्डरशी संपर्क तुटला असला तरी या मोहिमेतील ऑर्बिटर अजून आपले काम चोख बजावत आहे. लॅण्डरच्या संपर्काबाबत एक राष्ट्रीय समिती चौकशी करत आहे. या समितीच्या अहवालानंतरच केंद्राच्या आगामी योजनांबाबत ठरविले जाईल अशी ग्वाही इस्रोप्रमुख के. सिवन यांनी गुरुवारी दिली.
‘चांद्रमोहीम-2’मधील ऑर्बिटर व्यवस्थित काम करत आहे. मोहिमेतील इतर उपकरणेही सुरू आहेत. केवळ विक्रम लॅण्डरकडूनच काही सिग्नल मिळत नाही, असेही सिवन म्हणाले. आगामी योजनांवरही काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानग्या घेणे बाकी असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
हिंदुस्थानचे सागरी सामर्थ्य वाढले…
शत्रूला सहज चकवा देण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक ‘आयएनएस खंदेरी’चे येत्या शनिवारी, 28 सप्टेंबरला माझगाव डॉक येथे संरक्षणमंत्री राजना सिंह यांच्या उपस्थितीत जलावतरण होणार आहे. स्कॉर्पीन श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून दोन वर्षांपूर्वी याच श्रेणीतील ‘आयएनएस कलवरी’ नौदलात दाखल झाली होती.

























































