इस्रोचा ‘जीसॅट-११’ ३० नोव्हेंबरला अवकाशात झेपावणार

54
gsat

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आतापर्यंतचा सर्वाधिक वजनाचा सॅटेलाइट लाँच करण्याची तयारी ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ (इस्रो) मध्ये सुरू आहे. येत्या ३० नोव्हेंबरला ‘जीसॅट-११’ हा तब्बल ५.७ टन वजनाचा सॅटेलाइट अवकाशात झेपावणार आहे. युरोपमधील स्पेसपोर्ट फ्रेंच गयाना येथून या सॅटेलाइटचे लाँचिंग होणार आहे. इस्रोचे चेअरमन के. शिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जीसॅट-६ए’ हा सॅटेलाइट लॉन्च केल्याच्या दोन दिवसांनंतरच त्याच्याशी आमचा संपर्क तुटला होता. इस्रोतील वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतर जीसॅट-११ ला माघारी बोलवण्याचा निर्णय घेण्यात असून एक्सपर्टची मते घेतल्यानंतर आता हा सॅटेलाइट अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थानातील इंटरनेटची गती वाढविण्यासाठी हा सॅटेलाइट अंतराळात पाठविण्यात आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या