पृथ्वीवर येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना देणार इस्रो आणि नासाचे ‘निसार’

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची अवकाश संस्था (नासा) 2022 मध्ये एक सॅटेलाइट लॉन्च करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे नैसर्गिक संकटांपासून रक्षण करणे शक्य होणार आहे. कोणत्याही धोक्याची किंवा संकटाची पूर्वसूचना हा सॅटेलाइट देणार आहे. हा जगातील सर्वात महागडा अर्थ ऑब्जरवेशन सॅटलाईट असेल. त्याचे नाव (NASA-ISRO Synthetic Aperture Radar – NISAR) ‘निसार’ ठेवण्यात आले आहे. या सॅटेलाइटसाठी 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

वादळ, ज्वालामुखी, धरतीचा बदलणार प्रस्तर, भूकंप, ग्लेशियर वितळणे, समुद्री वादळे, जंगालातील वणवा, समुद्रातील जलस्तरातील वाढ किंवा घट, मॉन्सूनची स्थिती यासारख्या नासर्गिक संकटांची पूर्वसूचना सॅटेलाइट देणार आहे. तसेच अवकाशात जमा होणारा कचरा तसेच अवकाशातून पृथ्वीला असलेल्या धोक्यांची माहितीही सॅटेलाइट देणार आहे.

इस्रो आणि नासा एकत्रितपणे स्पेस सिचुएशनल अवेअरनेस योजना राबवत आहेत. त्यानुसार हा सॅटेलाइट लॉन्च केला जाणार आहे. याचे रडार 240 किलोमीटर क्षेत्रातील छायचित्रे घेण्यास सक्षम असेल. पृथ्वीभोवती फिरण्यास सॅटेलाइटला 12 दिवस लागणार आहेत. त्यामुळे 12 दिवसानंतर विशिष्ठ ठिकाणचे ताजे फोटो सॅटेलाइट पाठवणार आहे.

लॉन्चिगनंतर हा सॅटेलाइट पाच वर्षे काम करणार आहे. या काळात नैसर्गिक आणि इतर संकटांची माहिती आणि पूर्वसूचना तो वैज्ञानिकांना पाठवणार आहे. त्यामुळे संकटांचा समाना करण्यास मदत होणार आहे. या सॅटेलाइटच्या निर्मितीत अहमदाबादच्या स्पेस अॅप्लीकेशन सेंटरमधील पाच वैज्ञानिक मदत करत आहेत. तपन मिश्रा, मनब चक्रवर्ती, राजकुमार,अनुप दास आणि संदीप ओझा अशी त्यांची नावे आहेत. सॅटेलाइटने पाठवलेल्या माहितीच्या आधारे पृथ्वीवर होणाऱ्या बदलांचा ते अभ्यासही करणार आहेत.

हा सॅटेलाइट कोणत्या कुठून लॉन्च करण्यात येणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, हिंदुस्थानातील जीएसएलव्ही – मार्क 2 रॉकेटने सॅटेलाइट लॉन्च करण्यात येणार आहे. या सॅटेलाइटमध्ये अद्ययावत उपकरणे असणार आहेत. निसार लॉन्च झाल्यानंतर जगावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि संकटांची पूर्वसूचना मिळणार आहे. त्यामुळे जगासाठी हा उपयुक्त सॅटेलाइट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या