इस्रोने प्रसिद्ध केले चंद्राचे फोटो

1050

हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चंद्राचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटर हाय रिझोल्युशन कॅमेऱ्याने हे फोटो काढले आहेत.

या फोटोमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर लहान मोठे खड्डे असल्याचे दिसत आहे. चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरला चंद्रावर उतरण्यात अपयश आले असले तरी चंद्राभोवती फिरणारे ऑर्बिटर मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावत आहे. याच ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावरील हे फोटो पाठवले आहेत.

.

आपली प्रतिक्रिया द्या