इस्रोची दुसरी एअर ड्रॉप चाचणी यशस्वी, अंतराळातून पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याची गॅरंटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतराळात पाऊल ठेवणे रोमांचक असते तर पृथ्वीवर सुरक्षितपणे परतणे आव्हानात्मक असते. मानवी अंतराळात मोहिमेत खरी परीक्षा पृथ्वीवर सुखरूप परतण्याची असते. याच दृष्टिकोनात इस्रो गगनयान मिशनच्या प्रत्येक लहानमोठय़ा चाचण्यांवर गांभीर्याने काम करत आहे. अंतराळात गेलेल्या मानवाला पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची दुसरी इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट आज यशस्वी झाली. गगनयान मोहिमेंतर्गत दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात झाली. याअंतर्गत हेलिका@प्टरचा वापर करून क्रू मॉडय़ूलची उंचीवरून चाचणी घेण्यात आली. अंतराळवीरांच्या सुरक्षित परतीसाठी पॅराशूट प्रणालीची पडताळणी झाली.

कशी झाली चाचणी…

– अवकाशातून परतणाऱया क्रू मॉडय़ूलच्या पॅराशूट प्रणालीची कार्यक्षमता तपासणे, जेणेकरून अंतराळवीर सुरक्षितपणे समुद्रात उतरू शकतील, हे चाचणीचे उद्दिष्टय़ होते.
– ही चाचणी इस्रो, हवाई दल, डीआरडीओ आणि नौदल यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली. एअर ड्रॉप चाचणी गगनयान मानव अंतराळ मोहिमेच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे, ज्याची तयारी बरीच पूर्ण झाली आहे.
– हिंदुस्थानचे पहिले मानव अंतराळ मिशन 2027 श्रीहरिकोटा येथून लाँच होणार आहे. तांत्रिकी गुंतागुतींमुळे अनेक मिशन रखडले. हे स्वदेशी मिशन आहे.