इटलीमध्ये 24 तासांत 651 जणांचा मृत्यू

1248
फोटो- प्रातिनिधीक

कोरोना व्हायरसचा चीननंतर सर्वाधिक इटलीला फटका बसला आहे. जगात 14 हजार सहाशे नागरिकांचा मृत्यू झाला असून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. यापैकी इटलीत साडेपाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 180 देशांत कोरोनाने थैमान घातले असून अर्थव्यवस्था पहिल्यांदा कोलमडून पडली आहे. शनिवारी एका दिवसात इटलीत 793 तर रविवारी 651 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इटलीत कोरोनाने चीनपेक्षा जास्त बळी घेतल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 3,215 मृत्यू, तर 81,051 नागरिक कोरोना बाधित, स्पेन – 1,720 मृत्यू, 28,572 संसर्ग, इराण – 1,685 मृत्यू, 21,638 संसर्ग फ्रांस- 562 मृत्यू, 14,450 संसर्ग, अमेरिका – 340 मृत्यू, 26,747 संसर्ग, ब्रिटन – 233 मृत्यू, नेदरलँड – 136 मृत्यू, दक्षिण कोरिया – 104 मृत्यू, तर जर्मनीमध्ये 84 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या