आयकर विभाग करदात्यांसाठी लवकरच एक नवीन ई-फायलिंग पोर्टल 3.0 घेऊन येणार आहे. हे नवे पोर्टल आल्यानंतर आयटीआर फाईल दाखल करण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. हे पोर्टल वापरण्यासाठी खूपच सोपे असेल. तसेच आयकर रिटर्न करणे खूपच कमी वेळेत केले जाऊ शकते. आयकर विभागाने सर्क्युलर जारी केले असून त्यात म्हटले की, सध्याचे ई-फायलिंग पोर्टलसोबत इंटिग्रेटेड ई-फायलिंग आणि सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर 2.0 सिस्टम लागू आहे.