इझमायट्रिप डॉटकॉम या हिंदुस्थानातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मने आपला 16वा अॅनिव्हर्सरी सेल सुरु केला आहे, ज्यामध्ये प्रवास सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीवर मोठी सूट देण्यात आली आहे. 11 जून 2024 पर्यंत चालणाऱ्या या स्पेशल सेलचा प्रवाशांना विमाने, हॉटेल्स, बस तिकिटे, कॅब रेण्टल्स आणि हॉलिडे पॅकेजेसवर आकर्षक ऑफर प्रदान करत अधिक उत्साह देण्याचा मानस आहे.
16व्या अॅनिव्हर्सरी सेलदरम्यान ग्राहक विमानांवर जवळपास 7500 रूपये सूट, हॉटेल्सवर जवळपास 10 हजार रूपये सूट, बसेसवर जवळपास 15 टक्के सूट, कॅब्सवर जवळपास 12 टक्के सूट, ट्रेन्सवर जवळपास 10 टक्के त्वरित कॅशबॅक, हॉलिडेजवर 60 हजार 990 रूपयांतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवास आदी सूटचा आनंद घेऊ शकतात. या सूटचा आनंद घेण्यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून बुकिंग करताना कूपन कोड इएमटी 16 चा वापर करू शकतात. तसेच, आयसीआयसीआय बँक, बॉबकार्ड, अमेरिकन एक्स्प्रेस, आरबीएल बँक व एचएसबीसी बँक अशा निवडक बँक सहयोगींसह बुकिंग करत वापरकर्ते अधिक सूटचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा प्रवास अनुभव अधिक उत्साहित होईल. सेलला अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी सेल कालावधीदरम्यान करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला वाइल्डक्राफ्ट, पीव्हीआर, द मॅन कंपनी, सॅम अँड मार्शल आणि ग्रोफिटर अशा निवडक ब्रँड सहयोगींकडून स्पेशल गिफ्ट्स जिंकण्याची संधी आहे.