370 कलम हटवल्यानंतर जम्मू-कश्मीर पर्यंटकांसाठी खुले

367

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर 66 दिवसांनी जम्मू- कश्मीर खोरे पर्यंटकांसाठी खुले करण्यात आले आहे. जम्मू-कश्मीर सरकारने कलम 370 हटवण्याआधी पर्यंटकांना कश्मीर सोडून जाण्याची सुचना दिली होती. ती आता मागे घेण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने पर्यटकांना सर्वतोपरि सहाय्यता करण्याची घोषणा केली आहे.

जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गेल्या सोमवारी जम्मू-कश्मीरमध्ये गृह विभागाने दिलेल्या सूचना हटवण्याचे निर्देश दिले होते. 370 कलम हटवण्याआधी 2 ऑगस्टला राज्य प्रशासनाने एक सल्लागार समिती नेमली होती. या समितीने पर्यटकांना कश्मीर सोडून जाण्याच्या सुचना दिल्या होत्या. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये हिंसाचार उसळण्याची शक्यता होती. यामुळेच पर्यंटकांना कश्मीर सोडून जाण्याच्या सूचना सल्लागार समितीने दिल्या होत्या. पण आता येथील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने व जनजीवन सामान्य झाल्याने पर्यंटकांसाठी कश्मीर खुले करण्यात आले आहे.

दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील काही भागात अद्यापही मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहेत. यामुळे पर्यंटक हॉटेलचे बुकींग करणार कसे असा प्रश्न येथील हॉटेल व्यावसाय़िकांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या