जम्मू-कश्मीर सीमेवर ‘मल्टीटायर’ सुरक्षा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून 20 मार्गांचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांकडून सीमेवर अत्यंत कडेकोट ‘मल्टीटायर’ सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत कश्मीर खोऱयात 60 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे.

जम्मू-कश्मीरात 370 वे कलम हटविल्यापासून पाकडय़ांकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. नवीन मार्ग शोधून घुसखोरी केली जात आहे. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत असला तरी घुसखोरी पूर्णपणे थांबलेली नाही, असे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.

घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या आठवडय़ात लष्कर आणि बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेऊन घुसखोरी रोखण्याबाबत सूचना दिल्या. सीमेवर हाय ऍलर्ट जारी केला.

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्यासाठी सीमेवर 20 नवीन मार्गांचा वापर केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांत 60 दहशतवाद्यांनी कश्मीर खोऱयात घुसखोरी केली. त्यातील 20 दहशतवादी पीर पांचाल परिसरातून घुसले आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. घुसखोरी रोखण्यासाठी मल्टीटायर सुरक्षा सीमेवर तैनात केली जात आहे. दोन ते तीन स्तराची ही सुरक्षा असेल. सीमेवर कडेकोट कुंपणाबरोबरच जवानांची संख्या वाढविली जाणार आहे. लष्करी आणि बीएसएफ जवानांसह सीमेवरील गावांमधील सुरक्षा समिती, पोलीस नागरिकांचीही पेट्रोलिंग वाढविली जात आहे. प्रत्येक नियंत्रण रेषा, आंतरराष्ट्रीय सीमेवरील कथुआ, सांबा, जम्मू, राजौरी, पूंछ, बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा जिल्हय़ातील हे घुसखोरीचे 20 मार्ग आहेत. दक्षिण कश्मीरात हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. बीएसएफकडून 180 किलो मीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कडेकोट पहारा दिला जात आहे. घनदाट जंगलांमध्येही सर्च ऑपरेशन सुरू आहे. चिनाब नदीमध्येही वॉटर पेट्रोलिंग केले जात आहे.