जॅकलीनला मिळाले अनोखे बर्थडे गिफ्ट!

549

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने मंगळवारी आपला वाढदिवस साजरा केला. देश-विदेशातील चाहत्यांसह बॉलीवूड सेलिब्रेटींनी तिच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. किकचे निर्माते कर्धा नाडियादवाला यांनी जॅकलीनला वाढदिवसानिमित्त अनोखे गिफ्ट दिले आहे. वर्धाने सोशल मीडियावर सलमान खान आणि निर्माते-दिग्दर्शक साजिद नाडियादवालासोबत जॅकलीनचा एक फोटो शेअर करत ‘किक-2’ची घोषणा केली आहे. किक-2च्या क्रिप्टचे काम पूर्ण झाले असून पुन्हा एकदा जॅकलीन आणि सलमानची जोडी त्यात पाहायला मिळेल. लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या