टॉप टेन यादीत मुंबई विद्यापीठ नापास

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात महाविद्यालये, मुक्त विद्यापीठे, सर्वसाधारण विद्यापीठे, कौशल्य विकास विद्यापीठे, आयआयटी, आयआयएम अशा वेगवेगळय़ा संस्थांची स्वतंत्र यादी आहे. सर्वसाधारण विद्यापीठांच्या 50 संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील केवळ तीन विद्यापीठे असून प्रतिष्ठत मुंबई विद्यापीठाला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठाने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर तामीळनाडूतील अण्णा विद्यापीठ दुसऱया स्थानी आहे. मुंबई विद्यापीठ या यादीत 18 व्या स्थानी आहे, तर शिवाजी विद्यापीठ 30 व्या स्थानी असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 50 व्या स्थानी आहे. कौशल्य विकास विद्यापीठांच्या यादीत पुण्याचे सिम्बॉयसिस पहिल्या क्रमांकावर आहे.

एकही कॉलेज नाही

दहा टॉप कॉलेजांत महाराष्ट्रातील एकही कॉलेज नाही. या यादीत दिल्लीतील 6 महाविद्यालये आहेत. यातील चार कॉलेजांनी पहिले चार क्रमांक पटकावले आहेत. दिल्लीतील हिंदू कॉलेज पहिल्या स्थानी आहे.

टॉप-10 विद्यापीठे

  • जादवपूर युनिव्हर्सिटी, कोलकाता
  • पंजाब युनिव्हर्सिटी, चंदिगड
  • केरळ युनिव्हर्सिटी, थिरुवनंतपुरम
  • उस्मानिया युनिव्हर्सिटी, हैदराबाद
  • गुवाहाटी युनिव्हर्सिटी, गुवाहाटी
  • अण्णा युनिव्हर्सिटी, चेन्नई
  • आंध्र युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम
  • कोचीन युनिव्हर्सिटी, केरळ
  • युनिव्हर्सिटी ऑफ कश्मीर, श्रीनगर
  • भारथीयर युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर