
वायएसआरसीपी (YSRCP) अध्यक्ष्य जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी सतत संपर्कात असल्याचा दावा जगन यांनी केला आहे.
जगन मोहन रेड्डी म्हणाले आहेत की, “राहुल गांधी जेव्हा मतदानातील गैरप्रकारांबाबत बोलतात, तेव्हा आंध्र प्रदेशातील मतमोजणीतील तफावतीबाबत ते का बोलत नाहीत? आंध्र प्रदेशात जाहीर झालेल्या निकालांमध्ये आणि मतमोजणीच्या दिवशीच्या निकालांमध्ये तब्बल 12.5 टक्के मतांचा फरक आहे. राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याबाबतही का बोलत नाहीत, जे स्वतः आमदारकीची निवडणूक हरले होते? ते असं का करत नाहीत?”
ते म्हणाले की, “राहुल गांधी आंध्र प्रदेशाबाबत बोलत नाहीत, कारण चंद्राबाबू नायडू रेवंत रेड्डीमार्फत त्यांच्याशी हॉटलाइनवर संपर्कात आहेत.” जगन यांच्या या दाव्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.