जगदीप यांच्या निधनानंतर घडला ‘हा’ प्रसंग, नेटकरी करताहेत जावेद जाफरींचे कौतुक

3808

कॉमेडीच्या अचूक टायमिंगने गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे 8 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्यावर माझगाव येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या सुपूर्द ए खाकवेळी घडलेल्या एका प्रसंगाने चाहते त्यांचा मुलगा जावेद जाफरी याचं कौतुक करत आहेत.

या दुःखद प्रसंगाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांचे दोन्ही मुलगे जावेद आणि नावेद हे दिसत आहेत. वडिलांवर अंत्यसंस्कार करून परतताना त्यांचं वाटेत माध्यमांशी झालेलं संभाषण या व्हिडीओमध्ये आहे. अतिशय दुःखद प्रसंग असूनही यात अभिनेता जावेद जाफरी माध्यमकर्मींची आपुलकीने विचारपूस करताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर जावेद तिथे उपस्थितांना चहा पाणी घेतलंत का, अशी विचारणाही करताना दिसत आहे.

या व्हिडीओत जावेद आणि नावेद माध्यमकर्मींना जगदीप यांच्यावरील प्रेमासाठी धन्यवाद देत असून सगळ्यांच्या मेसेजना उत्तर न देऊ शकत असल्याची दिलगिरीही व्यक्त करत आहेत. आपल्या वडिलांनी गेल्या सत्तर वर्षांत खूप मान मिळवला असल्याचंही ते सांगत आहेत. अशा प्रसंगी जावेद यांची आपुलकीची वागणूक पाहून नेटकरी जावेद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या