आगळं वेगळं – जगन्नाथ पुरी रथयात्रेच्या निमित्ताने…

jagannath-puri-rath-yatra

>> मंगल गोगटे

या वर्षीची रथयात्रा 12 जुलैला झाली. ओडिशातील पुरी त्यासाठी जगप्रसिद्ध आहे, शिवाय तिथल्या लांबलचक सोनेरी समुद्रकाठासाठी आणि जगन्नाथ मंदिरासाठीही. दरवर्षी लाखो भाविक जगन्नाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात. या देवळाबद्दल बघणाऱयाला आश्चर्यजनक वाटाव्यात अशा काही गोष्टी आहेत. हे तर सर्वसाधारणपणे मान्य आहे की उडणाऱया कपडय़ाची दिशा वाऱयाच्या दिशेमुळे ठरते. पण या तत्त्वाच्या अगदी विरुद्ध देवळावरचा झेंडा वागतो. तो वाऱयाच्या उलट दिशेने उडत असतो. गंमत म्हणजे यासाठी काहीही शास्त्राrय स्पष्टीकरण देता येत नाही. हजारो वर्षांपूर्वी बांधलेल्या या देवळाचं स्थापत्यशास्त्रदृष्टय़ादेखील मोठं मोल आहे.

z यावरून काहीही उडत नाही. अर्थात यावरून विमानं उडत नाहीत. कारण ती जागा ‘नो फ्लाइंग झोन’ आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, पक्षीदेखील देवळावरून उडत नाहीत. कारण हे देऊळ म्हणे वरून सुदर्शन चक्रासारखं दिसतं म्हणून.

z देवळावरील झेंडा बदलण्यासाठी दररोज एक पुजारी देवळाच्या भिंतींवरून सुमारे 45 मजले उंचीइतका वर चढतो, तेही कोणत्याही खास सुरक्षेशिवाय. मंदिर बनल्यापासून आजपर्यंत हे अखंडपणे चालू आहे. शिवाय असा विश्वास आहे की एक दिवस जरी यात खंड पडला तरी मंदिर खूप काळपर्यंत (18 वर्ष) बंद होईल.

z सावली प्रत्येक वस्तूला असतेच. परंतु या देवळाला सावलीच नाही. कोणत्याही वेळी नाही कोणत्याही दिशेने नाही. हे स्थापत्य शास्त्राचं कौतुक म्हणायचं की जगन्नाथाने मानवाला दिलेला संदेश, याबद्दल आजपर्यंत कुणी फारसं भाष्य केलेलं नाही.

z देवळाच्या कळसावर असलेल्या सुदर्शन चक्राबद्दलदेखील दोन आश्चर्य आहेत. जवळजवळ एक टन वजन असलेलं ते चक्र कोणतीही यांत्रिक मदत नसताना माणसांनी फक्त हातांनी ते एवढय़ा उंच कसं काय नेलं असेल, हे पहिलं आश्चर्य आणि दुसरं त्याच्या स्थापत्याबद्दल. कुठूनही पाहिलं तरी ते चक्र सारखंच दिसतं. ते सगळ्या बाजूंनी तसंच दिसतं. म्हणजे हे बनवलं तरी कसं आहे?

z हिंदू धर्माप्रमाणे अन्नाची नासाडी करणं वाईट समजलं जातं. मंदिरात काम करणारी माणसं हा संकेत पाळतात. दर दिवशी या मंदिराला एकूण 2000 ते 2,00,000 एवढे भक्तगण भेट देतात. नक्की आकडा कुणालाच माहीत नसतो. परंतु इथे प्रसाद म्हणून बनवलेल्या अन्नापैकी एकही कण अन्न कधीही फुकट जात नाही वा कमीही पडत नाही. हे तेथील मंडळीचं कुशल व्यवस्थापन की जगन्नाथाची इच्छा म्हणायची, यावरही कुणी भाष्य केलेलं नाही.

z अजूनही इथे जुन्या पारंपरिक पद्धतीने प्रसाद बनवला जातो. जळत्या लाकडांच्या चुलीवर एकावर एक अशी सात भांडी ठेवून त्यात प्रसाद शिजवला जातो. गंमत अशी की, त्यापैकी सर्वात वरच्या भांडय़ातला प्रसाद प्रथम शिजतो आणि अगदी अग्नीजवळचा सगळ्यात शेवटी. हे अन्न शिल्लक राहिलं तरी कधीही फुकट जात नाही.

z देवळात एकदा का प्रवेशद्वारातून आत पाय ठेवला की लाटांचा आवाज पूर्णतः बंद होतो. शिवाय वाराही निसर्गनियम पाळत नाही. साधारणपणे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे येतो आणि रात्री त्याउलट. पण पुरीमधे मात्र वारा बरोब्बर उलट दिशेने वाहतो. दर 14 ते 18 वर्षांनी देवाच्या मूर्ती मातीत पुरल्या जातात आणि नवीन मूर्तींची स्थापना करण्यात येते.

अनेक तत्त्ववेत्ते या यात्रेला आयुष्याचा मोक्षाकडे नेणारा प्रवास या अर्थाने बघतात. पूर्वी काही भक्त या रथाखाली स्वतःला झोकून देत मोक्ष मिळविण्याचा प्रयत्न करत. परंतु या पद्धतीवर आता बंदी घालण्यात आली आहे.

z हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे ते इथल्या वार्षिक रथयात्रेसाठी. या रथयात्रेत तीन रथ वापरले जातात. दरवर्षी ते रथ एका विशिष्ट प्रकारच्या लाकडातून नवीन बनवले जातात. इथे घडणाऱया काही गूढ गोष्टींमुळे, ज्याला काहीही शास्त्राrय कारणमीमांसा नाही. जगभरातील लोकांना ही जागा आकर्षित करते. शिवाय हिंदू इतिहास आणि संस्कृती याबद्दल परदेशीयांना कुतूहल आहेच. ही यात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला निघते. जगन्नाथाची मूर्ती, धाकटी बहीण सुभद्रा आणि मोठा भाऊ बलराम यांच्या बरोबरपण वेगवेगळ्या रथातून गुंडीचा माता मंदिराकडे जायला निघते. अनेक कथांपैकी एक कथा अशी की, गुंडीचा ही राजा इंद्रद्युम्नची राणी. हिच्या भक्तीने खूश होऊन देवाने तिला वर दिला की, ‘‘वर्षातून एकदा काही दिवस मी तुझ्या राजवाडय़ाला भेट देईन.’’ त्याप्रमाणे जगन्नाथाची यात्रा कलिंग पद्धतीने बांधलेल्या तिच्या या घराकडे जाते. असा विश्वास आहे की, ज्या व्यक्ती रथ ओढतात वा त्या दोऱयाला स्पर्श करतात त्यांना अनेक तपांसाठी पुण्य मिळतं. 45.6 फूट उंच व 18 चाकांच्या जगन्नाथाच्या रथाला लाल आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. बालभद्राच्या 45 फूट ऊंच व लाल आणि हिरव्या रथाला 16 चाकं असतात, तर सुभद्राच्या 44.6 फूट उंच रथाला 14 चाकं आणि लाल व काळा रंग असतो. आठ दिवस विश्रांती झाल्यावर भगवान जगन्नाथ दशमीला आपल्या घरी परत येतात.

z [email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या