
राजस्थानातील जयपूर येथे एक भीषण अपघात घडला आहे. मद्यधुंद डंपर चालकाने एका पाठोपाठ 5 गाड्यांना जबरदस्त धडक दिली, ज्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 40 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अनेकजण गाड्यांच्या खाली दबले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हा अपघाच लोहामंडी परिसरात घडला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, डंपरच्या समोर जो कोणी येत होतं त्यांना चिरडत गेला. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. पहिल्या कारला टक्कर मारल्यानंतर तो न थांबता पुढच्या चार गाड्यांना धडक देत गेला. तर अन्य एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की. डंपर चालक 5 किमीपर्यंत जे दिसेल त्याच्यावर आदळत जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक 5 गाड्यांना टक्कर मारत 50 लोकांना चिरडले. ज्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अजूनही काही लोकं गाड्यांच्या खाली दबली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून डंपर चालक आणि मालक दोघांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.


























































