‘जैश’च्या चार कुख्यात दहशतवाद्यांना अटक

450

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथील अरिहाल भागात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱया जैश-ए-मोहम्मद या कुख्यात संघटनेच्या 4 दहशतवाद्यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. हा बॉम्बस्फोट जुलै महिन्यात श्रीनगरच्या अरिहाल भागात झाला होता. पोलिसांनी याबाबत सांगितले की, पुलवामा येथे जुलैमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असताना पोलिसांना शारीक अहमद हा दहशतवादी यात सामील होता असे उघड झाले. त्याच्यावर नजर ठेवली तेव्हा तो सतत एका परदेशी दहशतवाद्याशी संपर्क साधत असल्याचे लक्षात आले. आकिब अहमद, आदिल अहमद मीर आणि ओवेस अहमद या जैशच्या तिघा दहशतवाद्यांच्या साथीने आपण अरिहाल येथे बॉम्बस्फोट घडविल्याचे शारीक अहमदने कबूल केले. त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली.

 

आपली प्रतिक्रिया द्या