जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हंदवारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू कश्मीरमधील अखनूर सेक्टरमधील सभेआधी सुरक्षा दलांनी एका जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. पुलवामा जिल्ह्यातील हंदवाडा भागात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत त्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. दानिश असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे. या चकमकीनंतर पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध कारवाई सुरू केली आहे. या दहशतवाद्यांकडून एक एके47 रायफल जप्त करण्यात आली आहे.

पुलवामा जिल्ह्यातील हंदवाडा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना दिली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दहशतावाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या चकमकीत एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला. आणखी काही दहशतवादी या भागात लपले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.