छत्तीसगडच्या बलौदाबाजारात सतनामी समाजाने आपल्या मागण्यांसाठी मोठं आंदोलन केले. प्रदेशातून आलेल्या सतनामी समाजातील लोकांनी दशहरा मैदानात आंदोलन केले. यावेळी हजारो संख्येने सतनाम समाजाची लोकं पोहोचली होती आणि दशहरा मैदानात एकजूट होवून तीव्र आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आणि वाद पेटला. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
या दरम्यान अनेक आंदोलकांसह पोलिसह जखमी झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाने बेरिकेड्स तोडले. त्यानंतर ते कलेक्टर परिसरात घुसले आणि तिथेही तोडफोड केली. जवळपास 200 मोटारसायकल आणि 100 गाड्यांचे नुकसान केले. जमावाचे उग्र रुप पाहता काही क्षण पोलीसही थक्क झाले. नुकतेच गिरौदपुरीच्या महकोनी गावात संत अमरदास यांच्या मंदिरातील जैतखाम कापण्याच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी हे आंदोलन होत होते. त्याचवेळी राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांनीही सतनामी समाजाच्या मागणीवर न्यायालयीन चौकशी करण्याबाबत बोलले होते. दुसरीकडे, आंदोलन पाहता पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी परिसराला चारी बाजूंनी बॅरिकेड्स लावले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
17 मे रोजी बालोदा बाजार जिल्ह्यात असामाजिक तत्वांनी गिरौदपुरी धामच्या अमर दास गुहेची तोडफोड केली होती आणि तेथे स्थापित जैतखाम तोडले होते. यानंतर सतनामी समाज चांगलाच संतापला होता. त्यानंतरही समाजातील लोकांनी गिरौदपुरी चौकी येथे जोरदार निदर्शने केली होती. यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर लोकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.