जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने कापसाची झाली माती

जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे. त्यात भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात घरात येत असलेल्या पांढऱ्या सोन्याला निसर्गाची दृष्ट लागली आहे. शेतकऱ्याने येणाऱ्या काळातील सन,उत्सव चांगले साजरे होईल असे वाटत असतानाच गेली तीन ते चार दिवसापासून कोसळणारा पाऊसने पांढऱ्या सोन्याची माती केली आहे.

सततच्या पावसामुळे कापुस भिजल्याने तो ऊन पडले तर वाळविण्यासाठी अंगणात टाकला जात आहे. पारधसह परिसरात सर्वदुर असलेले हे चित्र शेतकऱ्यांची चिंता वाढवित आहे. दरम्यान तीन ते चार दिवसापासून काही भागात जोरदार पाऊस झाल्याने कापसाची दाणादाण उडाली.

ऐन कापणीच्या वेळी पडला पाऊस

पारधसह परिसरात सुरवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे कापुस पिक जोमात होत या पिकाला कापुसही लागला चांगला फुटला होता.आता पिक घरात येणार ही परिस्थिती असतानाच गेल्या काही दिवसापासून पावसाला सुरुवात झाली, थोडीही उसन घेत नसल्याने फुटलेला कापुस झाडाला ओला होत आहे. गळून पडून मातीत खराब होऊ नये यासाठी वेचनी करून घरी आणला जात आहे.

तीन चार दिवस सलग पाऊस

गेल्या तीन ते चार दिवसापासून पारध परिसरात अवकाळी पाऊस पडल्याने वेचणी थांबली व झाडावरच कापुस ओला झाला आहे. यापुर्वी झाडाला असलेल्या सोयाबीनला कोंब फुटले होते.

सोयाबीन, मुंग, मिरची, मका,ज्वारी व इतर शेतमाल खराब झाला लागवड खर्चा इतकेही उत्पादन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार कपाशीवर आहे. कापुस भिजल्याने वाळविण्यासाठी आणखी किती दिवस लागणार आणि भाव काय मिळणार यांची चिंता शेतकऱ्यांला लागली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या