गुलाबराव पाटलांना होमपीचवर मोठा धक्का, शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी विजयी

जळगाव – धरणगाव नगरपालिका निवडणुकीच्या निकालात मिधे गटाचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का बसला आहे. पाटलांच्या होमपीचवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. धरणगाव नगरपालिकेत महाविकास आघाडी प्रणित शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी २ हजार ४४७ मतांनी विजयी झाल्या असून शिंदेसेनेच्या वैशाली भावे यांना पराभव पत्करावा लागला आहे.

स्थानिक तहसील कार्यालयात सकाळपासून धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू होती. धरणगाव नगरपरिषदेत ११ प्रभाग असून नगराध्यक्ष आणि २३ नगरसेवक अशी २४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडी शहर आघाडीने शिंदेसेनेला धक्का दिला आहे.