जालना – बदनापूर शहरात कोरोना रुग्ण सापडल्याने प्रशासन अलर्टवर, पीपीई किट घालून आरोग्य तपासणी

507

कोरोना मुक्त असलेल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात कोरोना शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. शहरातील दोन व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने नगर पंचायत,आरोग्य विभाग व पोलीस विभागाने तातडीने उपाययोजना सुरु केल्या असून कोरोनाग्रस्त ठरलेल्या बाजारगल्ली व शिवाजी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत सील करण्यात आलेल्या भागात 4 नर्स आणि 20 आरोग्य सेविका पीपीई किट धारण करून दाखल झाल्या. या भागातील जवळपास 500 नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी तहसीलदार संतोष बनकर यांनी सील केलेल्या भागाला भेट देऊन पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

जालना-संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बदनापूर तालुक्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले होते. कारण संभाजीनगर जिल्हा हा कोरोना महामारीमुळे `रेड झोन’ घोषित झालेला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन 3 पर्यंत बदनापूर तालुका सुरक्षित होता. मात्र लॉकडाऊन 4 संपण्याच्या वाटेवर असतांना शहरातील एका 65 वर्षीय व्यापाऱ्याचा संभाजीनगर येथे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त येऊन धडकले. पाठोपाठ एका 30 वर्षीय व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजताच शहरात खळबळ माजली.

screenshot_2020-05-29-16-07-42-476_com-google-android-gm

बदनापूर पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर,नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, पाणी पुरवठा अभियंता गणेश ठुबे, नगराध्यक्ष प्रदीप साबळे, नगरसेवक संतोष पवार, राजेंद्र जैस्वाल आदींनी धावपळ करीत बालाजी मंदिर ते मुस्लिम कब्रस्तानपर्यंतची बाजार गल्ली आणि शिवाजी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंतचा भाग सील करून या भागातील नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना नगर पंचायत कर्मचारी रशीद पठाण मौलाना, अशोक बोकन यांनी दिली

आपली प्रतिक्रिया द्या