
मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दादासाहेब बापूराव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भगवान नगर येथील दादासाहेब जायभाये हा 10 जून रोजी सकाळी मित्रांसोबत जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. त्याने चुर्मापुरी शिवारातील डाव्या कालव्यावरील पुलावरून पात्रात उडी मारली. मात्र तो नंतर वरच आला नाही. सोबतच्या मित्रांनी काही काळ वाट बघितली. तो वर न आल्याने मित्रांनी सदर घटना त्याच्या घरी सांगितली. गावकऱ्यांनी कालव्याकडे धाव घेतली व तील पाण्यामध्ये बेपत्ता झाल्याने गावकऱ्यांनी दादासाहेबचा पाण्यात शोध घेतला. परंतु 10 जून रोजी शोध लागला नाही. त्यानंतर पुन्हा 11 जून रोजी सकाळी गावकरी शोध घेण्यासाठी कालव्यात उडया घेतल्या. दादासाहेबचा मृतदेह पाण्यातील मोटारीला अडकून होता. या मोटारीला जोरजोरात हालविल्यानंतर मृतदेह पाण्यावर आला. दादासाहेबचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याच्या नातेवाईकानी ताब्यात घेतला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादासाहेब हा आई वडीलांना एकूलता एक होता. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर भगवान नगर परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
































































