जालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी 11 पॉझिटिव्ह, जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 72

473

जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोमवारी आणखी नवीन 11 रूग्णांची भर पडली असून जिल्ह्याची संख्या आता 72 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. जालना जिल्हा रुग्णालयातर्फे शनिवारी एकूण (106) संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन ते काल रविवारी सकाळी प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी (105) अहवाल काल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.

त्यात जालना शहरातील जुना जालना भागातील नामांकित असलेल्या एका खासगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या नूतनवाडी येथील (2),अंबड तालुक्यातील शिरनेर येथील (1), मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा (2) आणि कानडी येथील (1) अशा एकूण 11 रुग्णांचा समावेश असून त्यात (7) महिला व चार पुरुषांचा समावेश असल्याचे या सुत्रांनी सांगितले.

जालन्यातील अंबड चौफुलीजवळील खाजगी रुग्णालय सील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे घेतले नमुने मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवासी असलेली सदर महिला काही दिवसांपूर्वी जालना येथील अंबड चौफुलीजवल असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. सदर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्रास जाणवल्याने या महिलेला दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आणि सदर महिलेच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याने अंबड चौफुलीजवल असलेल्या खाजगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून या सर्वांना कॉरनटाईन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या