जालन्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा तीनवर

440

कोरोनामुळे जालना जिल्ह्यात गुरुवारी जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील कोरोनाचा हा तिसरा बळी ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील ६० वर्षीय महिला मंगळवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजाराने ग्रस्त असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते असे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. मंगळवारी दाखल झाल्यानंतर या महिलेच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना आज गुरुवारी दुपारी सदर महिलेचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात यापूर्वी परतूर तालुक्यातील मापेगाव येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीसह जालना शहरातील मोदीखाना भागातील ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता

आपली प्रतिक्रिया द्या