जालन्यात 5 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चुलत बहिणीने केला खून

किरकोळ कारणावरून रागाच्या भरात नववीच्या वर्गात शिकणार्‍या एका मुलीने पाच वर्षीय चुलत बहिणीला बाथरुमध्ये कोंडून घेत आतून दरवाजा लावून चेहर्‍यावर, मानेवार, हातावर, गळ्यावर धारदार ब्लेडने वार करून निघृर्ण खून केला. त्यानंतर रक्ताने माखलेले स्वत:चे कपडे बदलले. बाथरुममध्ये पाणी टाकून आजूबाजूला सांडलेले रक्ताचे डाग धुऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

जालना शहरातील चौधरीनगर भागात सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली. ईश्वरी रमेश भोसले (5 मूळ राग़ुंज,ता. घनसावंगी. ह.मु. चौधरीनगर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ती काकांकडे शिकण्यासाठी आली होती. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मृत चिमुकलीच्या चुलतीने दिलेल्या फिर्यादीवरून 14 वर्षीय मुलीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईश्वरी तिची 14 वर्षीय चुलत बहीण व आठ वर्षाचा चुलत भाऊ दुसर्‍या मजल्यावरील खोलीत होते. तेंव्हा 14 वर्षीय चुलत बहीण आवरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तर पाच वर्षीय ईश्वरी अंघोळीसाठी बाथरुमध्ये गेली. तिच्या पाठोपाठ 14 वर्षीय चुलत बहीण बाथरुमध्ये गेली. तिने ईश्वरीच्या हातांच्या नसांवर ब्लेडने खोलवर वार केले. तसेच चेहर्‍यावर मानेवर, गळ्यावर ब्लेडने अनेक वार केले. त्यामुळे त्या चिमुकला जीव तडफडत बाथरुममध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

ईश्वरीच्या ओरडण्याच्या आवाजामुळे चुलत भाऊ अर्थवही रडू लागला. त्यानंतर आरोपी मुलीने थंड डोक्याने अंगावरील रक्ताने माखलेले कपडे काढून दुसरे कपडे घातले. बाथरुममध्ये पाणी टाकून रक्ताचे डाग धुण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वरच्या मजल्यावर मुलाच्या ओरडण्याचा आवाज आल्याने मीरा भोसले धावतच वर आल्या. आजूबाजूचे शेजारीही धावले. त्यांनी आरोपी मुलीला आतून बंद असलेला दरवाजा उघडण्यास सांगितला. मात्र, दरवाजात आतून बंद होता. दरम्यान, काही वेळाने दरवाजा उघडल्यानंतर ईश्वरी रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली. एका तरुणाने तिला लगेच उचलून मंठा चौफुलीवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.