जालना जिल्ह्यातील भोगगावात सिंमेंट रस्ता दुभंगला, निकृष्ट कामाची चौकशी करण्याची गावकऱ्यांची मागणी

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने झालेले असून सिमेंट रस्त्याला मधोमध तडा जाऊन मोठी भेग पडल्याने रस्ता दुभंगून गेला आहे. रस्त्याला मोठी भेग पडल्याने वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता धोकादायक बनला असल्याने या रस्त्याने जाणे-येणे करण्याचे लोक टाळत आहेत.

रस्ता पूर्णपणे दुभंगून गेल्याने या रस्त्याचे काम पुन्हा नव्याने करण्याची मागणी ग्रामस्थानीं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. भोगगावच्या तुपसौंदर गल्लीत करण्यात आलेल्या या सिमेंट रस्त्याचे निकृष्ट कामाबाबत 21 सप्टेंबर 2019ला तक्रार केली होती. परंतु अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पुरी, ग्रामसेवक भोजने व सरपंच अंशीरम जाधव यांच्या संगनमताने निकृष्ट काम करून यात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या