जालना जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 914 वर

426

जालना शहरात कोरोनाचा पुन्हा जोरदार भडका उडाला असून नव्याने कोरोना बाधीत आढळून आलेल्या एकूण 41 पैकी तब्बल 40 रुग्ण हे जालना शहरातील असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा प्रशासनासह शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या आता 914 वर पोहचली आहे.

आज शुक्रवारी सकाळी 8 आणि त्यानंतर दुपारी 13 असे 21 रुग्ण सकाळपासून समोर आले असतानाच आता पुन्हा 41 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या 41 पैकी केवळ एक रुग्ण हा परतूर तालुक्यातील शिंगोना येथील असून उर्वरीत 40 रुग्ण हे जालना शहरातील आहेत. त्यात साईनगर (4), क्रांतीनगर (3), सुवर्णकार नगर (3), आणि संभाजीनगर (3) ,काद्राबाद (2),गवळी मोहल्ला (2) आणि गणपती गल्ली (2) तसेच अयोध्या नगर (1),अमित हॉटेल जवळ (1),जुना खवा मार्केट (1), कन्हेयानगर (1), ढवलेश्वर(1), कवाडीपुरा (1),रामनगर जालना (1), सदर बाजार (1), कालिकुर्ती (1), आशिर्वादनगर (1), मिशन हॉस्पिटल जवळ (1), एस. टी. कॉलनी (1),ग्रीनपार्क (1), अंबड चौफुली (1), गोपिकीशननगर (1), नूतन वसाहत (1), प्रयाग नगर (1), सरकारी दवाखाना (1),कांचन नगर (1),अमरछाया टॉकीज जवळ (1),ख्रिश्चन कॉलनी (1) रुग्णांचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या