‘घरासमोर चकरा का मारतो’, म्हणत तरुणाचा केला खून, जालना जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील उस्वद रोडवर हॉटेल दुर्गाच्या समोर शुक्रवार 22 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एका तरुणाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र रविवारी मध्यरात्री त्याची प्राणज्योत मालवली. काशिनाथ बापूराव सोनवणे (32) असे तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत काशिनाथ सोनवणे याला ‘आमच्या घरासमोर चकरा का मारतोस’, या कारणावरून प्रतिक उर्फ परव्या चंदा बोराडे, पांडू भगवान बोराडे, अर्जुन भगवान बोराडे आणि अनिल मुंजाजी बोराडे यांनी लोखंडी गजाच्या साह्याने बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतील काशिनाथला संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 24 जानेवारीच्या रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या