नजरकैदेतून राजकीय नेत्यांची सुटका

334
प्रातिनिधीक फोटो

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर परिस्थिती चिघळू नये आणि लोकांना चिथावणी देण्याची शक्यता असणाऱ्या विविध पक्षांतील नेत्यांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यातील काही नेत्यांची मंगळवारी नजरकैदेतून सुटका केली.  नजरकैदेतून सुटका करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी आमदार देवेंद्रसिंह राणा, सुरजीतसिंह सलाथिया, जावेद राणा, सज्जाद किचलू, काँग्रेसचे माजी आमदार रमण भल्ला, विकार रसूल आणि जम्मू-कश्मीर पँथर्स पक्षाचे माजी आमदार हर्षदेव सिंह यांची सुटका करण्यात आली. चिथावणीखोर आणि सार्वजनिक शांतता भंग होणार नाही अशा प्रकारची विधाने करू नयेत अशी सक्त ताकीद या नेत्यांना देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या