जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. झज्जर कोटली भागात हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अतीवृष्टीमुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. अपघात एवढा भीषण होता की, कोसळलेल्या बसचे भाग विखुरले होते.