जम्मू-कश्मीरमध्ये 40 सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण

485
प्रातिनिधिक फोटो

जम्मू कश्मीरमध्ये 40 सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. सीआरपीएफ जवानांसह 227 जण एकाच दिवसात कोरोना बाधित असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे जम्मू कश्मीरमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8,246 इतकी झाली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दिवसभरात 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 127 इतकी झाली आहे. यापैकी 14 जण जम्मू आणि 113 रुग्ण कश्मीरमधील आहेत. गेल्या चोवीस तासात 227 नवीन रुग्ण वाढले आहेत. यातील 30 रुग्ण जम्मू तर 197 कश्मीर येथील आहेत. तसंच जम्मू कश्मीरच्या विविध भागात तैनात असलेले 40 सीआरपीएफ जवानही कोरोना बाधित झाले आहेत.

जम्मू कश्मीरमधील 2976 रुग्णांवर इलाज सुरू आहे, तर 5143 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसंच, शनिवारी रात्रीपर्यंत आलेल्या अहवालामध्ये गांदरबल, कठुआ, रामबन, रियासी आणि किश्तवाड येथे एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या