जम्मू-कश्मिरचे विशेषाधिकार हंगामी, कलम 370 पुन्हा आणणे शक्य नाही; केंद्र सरकारने याचिकाकर्त्यांना सुनावले

829
supreme_court_295

अखंड आणि एकसंध हिंदुस्थानसाठी देशाची एकता राखणे महत्वाचे आहे. संघराज्य असलेल्या आपल्या देशात जम्मू कश्मीरला काही काळासाठी स्वायत्तता बहाल करण्यात आली होती.ती हंगामी होती.त्यामुळे 370 कलम पुन्हा आणणे शक्य नाही असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांना सुनावले .सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरूच राहणार आहे.

जम्मू कश्मीरला विशेषाधिकार देणारे 370 कलम रद्द करून घटनेतील अनुच्छेद 3 चा वापर करीत राज्याला केंद्रशासित बनवण्याला आक्षेप घेणारी याचिका काश्मिरी वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर ५ सदस्यीय घटनापीठ सुनावणी करीत आहे.या याचिकेवर मत मांडताना ऍटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी सांगितले ,हिंदुस्थान संघराज्यीय देश आहे. सर्व राज्ये हा अखंड देशाचाच अविभाज्य भाग आहेत. शिवाय जम्मू-कश्मीरला विलीनीकरणावेळी दिलेली स्वायत्तता ही हंगामी होती ,कायम नव्हती.मग या राज्याला विशेषाधिकार देणारे ३७० कलम केंद्र सरकारने भंग केले ,तर ती घटनेची अथवा मानवाधिकाराची पायमल्ली होत नाही.देशाच्या अखंडतेसाठी आणि एकात्मतेसाठी असे कठोर निर्णय सरकारला घ्यावेच लागतात असे वेणुगोपाल म्हणाले.

फुटीरतावाद्याचे समर्थन करणारी भूमिका राज्य सरकारला मान्य नाही -तुषार मेहता
जम्मू-कश्मिरात फुटीरतावादी भूमिकेचे समर्थन राज्य सरकार कदापिही करणार नाही. त्यामुळे जम्मू -कश्मिर बार असोसिएशनचे वकील जाफर अहमद शाह यांचे बहुतांश राजकीय हेतूने प्रेरित होते. त्याचा या केसशी संबंध नाही.आम्ही आता राज्याला घातक ठरणाऱ्या चुका सुधारतोय.पुन्हा त्याची पुरावृत्ती नको ,असा युक्तिवाद जम्मू -कश्मीर सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला

..तर याचिका सुनावणीसाठी मोठ्या खंडपीठाकडे सोपवू -सर्वोच्च न्यायालय
काश्मिरातील 370 कलम हटवण्याच्या याचिकेवर 5 सद्वयीय घटनापीठ सध्या सुनावणी करीत आहे.जर या सुनावणीत मोठे मतभेद झाले तर ही याचिका आम्ही पुढील सुनावणीसाठी 6 सदस्यीय मोठ्या पीठाकडे पाठवू ,असे घटनापीठाने स्पष्ट केले आहे .या घटनापीठात न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा,न्या. एस के कौल ,न्या. आर सुभाष रेड्डी ,न्या. बी आर गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या