जम्मू कश्मीर- अवंतीपोरामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान

358

जम्मू आणि कश्मीर मधील अवंतीपोरा भागात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. घटनस्थळावरून सुरक्षा दलांना शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा सापडला आहे. या चकमकीनंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतीपोरा इथल्या बाहेरील भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात दारुगोळा सापडला आहे. त्यामुळे परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू कश्मरीमधील रामबान येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक जवान शहीद तर दोन पोलीस जखमी झाले होते. घटनास्थळावरून युद्धासाठी वापरण्यात येतो तसा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या