जम्मू कश्मीरमध्ये भाजप सरपंचाची दहशतवाद्यांकडून हत्या

690
bjp-logo

जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड ब्लॉकमधील वेस्सू गावचे सरपंच असलेले सज्जाद अहमद यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. सज्जाद हे कुलगाम विभागाचे भाजप उपाध्यक्षही होते. गेल्या काही दिवसांतील भाजप नेत्यांवर हल्ला केला जाण्याची ही चौथी घटना आहे. 5 ऑगस्टला जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटविल्याच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी भाजपच्या शेख वसीम बारी यांची  हत्या केली होती. बारी यांचे वडील आणि भाऊ यांतीही दहशवाद्यांनी हत्या केली होती. शेख वसीम बारी हे बांदीपुरा भागाचे भाजप अध्यक्ष होते. बारी त्यांचे वडील आणि भाऊ यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या तिघांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

‘सज्जाद यांना वेस्सू येथील निर्वासित कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना तेथून बाहेर न जाण्याचे आदेश होते. मात्र गुरुवारी सकाळी ते त्यांच्या घरी जायला निघाले. घरापासून अवघ्या 20 मीटरवर असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला’,असे पोलिसांनी सांगितले.

बुधवारी काझीगुंडमधीलच अखरन मीर या गावचे सरपंच अरीफ अहमद या सरपंचांवर गोळीबार केली होता. त्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. या दोन घटनांच्या आधी भाजप नेते वासिम बारी व काँग्रेस सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. बारी यांच्या हत्येची जबाबदारी द रेसिंजंस फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली होती. जैश ए मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी मिळून ही नवी संघटना तयार केली आहे. म

आपली प्रतिक्रिया द्या