कश्मीर पोलिसांची ‘चलाख बनवाबनवी’!

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीरमध्ये चकमक तसेच शोधमोहिमेदरम्यान पोलीस आणि लष्कराच्या जवानांवर दगडफेक केली जाते. दगडफेक करण्यासाठी अशा माथेफिरू तरुणांना पाकिस्तान पैसा पुरवते. अशा माथेफिरूंना पकडण्यासाठी पोलीस आता त्यांच्यामध्येच राहून त्यांची धरपकड करू लागले आहेत. श्रीनगरमध्ये शुक्रवारी दगडफेकीच्या एका घटनेत वेषांतर केलेला पोलीस दगडफेकीत सहभागी झाला आणि संधी मिळताच दगडफेकीला चिथावणी देणाऱया म्होरक्याला त्याने असे पुराव्यानिशी पकडले.