
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्याला आज रविवारी पहाटे भूकंपाचे दोन सलग धक्के जाणवले. अवघ्या 15 मिनिटांच्या अंतराने झालेल्या या दोन भूकंपामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून, धक्के जाणवताच लोकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, पहिला भूकंप पहाटे 4 वाजून 22 मिनिटांनी झाला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी मोजली गेली. या पहिल्या धक्क्यातून सावरत नाही तोच, पहाटे 4 वाजून 37 मिनिटांनी दुसरा भूकंप झाला. या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल इतकी होती आणि त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होता.
EQ of M: 4.6, On: 12/04/2026 04:22:28 IST, Lat: 33.056 N, Long: 75.914 E, Depth: 10 Km, Location: Doda, Jammu and Kashmir.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @GSuresh_NCS @ndmaindia pic.twitter.com/Ks2rZCM4jw— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 11, 2026
सुदैवाने, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेच्या मोठ्या नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र, एकामागून एक बसलेल्या दोन धक्क्यांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.


























































