जम्मू-कश्मीरातील आणखी चौघांची नजरकैदेतून सुटका, महिना अखेरपर्यंत 20 नेत्यांना मुक्त करणार

423
प्रातिनिधीक फोटो

कलम 370 हटवल्यानंतर स्थानबद्ध केलेल्या नेत्यांपैकी चौघांना जम्मू-कश्मीर प्रशासनाने शुक्रवारी सोडून दिले. त्याआधी गुरुवारी पाच नेत्यांची सुटका केली होती. महिनाअखेरपर्यंत आणखी 20 नेत्यांना मुक्त केले जाणार आहे.

कलम 370 हद्दपार झाल्यानंतर खबरदारी म्हणून अब्दुल हक खान, नजीर अहमद गुरेजी, मोहम्मद अब्बास कानी आणि काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल राशिद यांची शुक्रवारी दुपारी नजरकैदेतून सुटका झाली. गुरुवारी अल्ताफ अहमद कालू, सलमान सागर, शौकत गनई, निजामदीन बट आणि मुख्तार बाबा हे नेते नजरकैदेतून मुक्त झाले.

तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या सुटकेबाबत प्रशासनाचे मौन
डॉ. फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, महबुबा मुफ्ती या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन आणि जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे शाह फैसल यांच्या सुटकेबाबत प्रशासनाने अजून मौन बाळगले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या