चंद्रपूरात केंद्राने लॉकडाउनला नकार दिल्यानंतर आता जनता कर्फ्युचा उतारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपुरात केंद्र सरकारने लॉकडाउनला नकार दिल्यानंतर आता जनता कर्फ्युचा उतारा शोधण्यात आला आहे. निश्चित तारीख ठरवून जनता कर्फ्यु लावण्याची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

 जिल्ह्यात 3 हजार 500 कोरोना बाधितांची नोंद झाली असून रोज सरासरी 200 रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचा पर्याय विचारात घेतला होता. मृत्यूसंख्येत देखील चंद्रपुर वेगाने पुढे जात असल्याने लॉकडाऊन नसले तरी आता नागरिकांनी जनता कर्फ्युला सहकार्य करून -नियम पाळून कोरोना नियंत्रणास मदत करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.