
बोनी कपूर आणि श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही सध्या बॉलीवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करत आहे. श्रीदेवीसारखीच सुंदर असलेली जान्हवी तिच्या फॅशन स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत राहिली आहे. वन पिस, गाऊन, साडी, ड्रेस, जिम लूक असं काहीही जान्हवीने घातलं तरी त्यात ती नेहमीच उठून दिसते.
View this post on Instagram#janhvikapoor snapped at salon in bandra today #viralbayani @viralbhayani
जान्हवी पुन्हा एकदा तिच्या एका लूकमुळे चर्चेत आली आहे. जान्हवीची न्यूड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिच्या लूकची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हा न्यूड लूक म्हणजे खरंच न्यूड नसून तर तिचा न्यूड रंगाचा
टाईट पेन्सिल ड्रेस आहे. त्या ड्रेस सोबत तिने सफेद रंगाचे स्निकर्स आणि काळी बॅग घेतली होती. तिचा हा लूक प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दाशियनच्या लूकवरून डिझाईन करण्यात आला आहे असे बोलले जात आहे. जान्हवीच्या आधी किमने न्यूड रंगाचा शॉर्ट टाईट ड्रेस घातला होता. तिचा तो लूक देखील खूप चर्चिला गेला होता.
जान्हवी लवकरच हिंदुस्थानची पहिली महिला कॉम्बॅट पायलट गुंजन सक्सेना हिच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार आहे. गुंजन सक्सेना हिने 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी गुंजनने स्वत:चा जीव धोक्यात घालून हिंदुस्थानी जवानांचे प्राण वाचवले होते. तिच्या या कार्यक्रमासाठी तिला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.


























































