107 वर्षे 300 दिवस, जुळ्या बहिणींचा विश्वविक्रम

जपानी लोक दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध असतात. नुकतीच जपानमधील दोन जुळ्या बहिणींची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. उमेनो सुमियामा आणि कोईमेकोदाना असी या जगातील सर्वात वयोवृद्ध जुळ्या बहिणींची नावे आहेत. 1 सप्टेंबर रोजी त्यांचे वय 107 वर्षे आणि 300 दिवस इतके होते. त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1913 साली शोडो आयलॅण्ड येथे झाला. जागतिक महायुद्ध आम्ही अगदी जवळून अनुभवल्याचे दोघी बहिणींनी सांगितले आहे. उमेनो यांचा विवाह आयलॅण्डमधील एका व्यक्तीसोबत झाला तर कोईमो यांचा विवाह आयलॅण्डबाहेरील व्यक्तीसोबत झाला. एकमेकापासून दोघी 300 किलोमीटर अंतरावर राहत होत्या. सध्या या दोघी एकत्र एका वृद्धाश्रमात राहतात.

आपली प्रतिक्रिया द्या