आता जपानमध्येही क्रिकेटचा प्रसार

हिंदुस्थानात क्रिकेट हा खेळ पहिल्या स्थानावर असला तरी आशियातील बहुतांशी देशांमध्ये हा खेळ अजूनही खेळला जात नाही. जागतिक स्तरावर कमी देश हा खेळ खेळत असल्यामुळे ऑलिम्पिकपासूनही हा खेळ दूर आहे. मात्र आयसीसी आपल्या परीने या खेळाचा प्रसार व प्रचार करीत आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया खंडातील जपान या देशातही क्रिकेटचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे.

जपान सरकारकडून ‘सॅनो क्रिकेट चॅलेंज प्रकल्प’ राबवण्यात येत असून याप्रसंगी हिंदुस्थानसोबतच जागतिक स्तरावरील क्रिकेट पर्यटक येथे यावेत यासाठी जपान सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतची घोषणा प्रकल्प व्यवस्थापक ओशियो अकियामा व विशाल कामत यांच्या उपस्थितीत करण्यात आली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत होणाऱया अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये जपानचा संघ सहभागी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या