
सामना प्रतिनिधी । टोकियो
जपानी अंतराळ संस्था ‘जास्का’ला उल्कापिंडाच्या पृष्ठभागावर दोन रोवर उतरवण्यात यश आले आहे. रायुगु या लघुग्रहावर रोवर उतरवले असून ते हयाबुसा 2 अंतराळ यानाबरोबर 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठवले गेले होते. रोवर 1 ए आणि रोवर 1 बी या दोन्हीपासून मिनर्व्हा टू रोवर अंतराळ यानापासून वेगळा होऊन रायुगुच्या पृष्ठभागावर उतरला. दोन्ही रोवर चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यातील रोवर 1 ने पृष्ठभागाचे फोटो पाठवायला सुरुवात केली आहे, तर दुसरा रोवर सध्या पृष्ठभागावर फिरत आहे. दोन्ही रोवर सशाप्रमाणे उड्या मारत अंतर कापत आहेत. त्यामुळे फोटो थोडे अंधुक येत असल्याची माहिती ‘जास्का’ने दिली आहे.


























































