आत्महत्या करण्याची इच्छा असणाऱ्याची केली हत्या; 9 जणांच्या हत्येप्रकरणी ‘ट्विटर किलर’दोषी

जपानमध्ये 9 जणांच्या हत्येप्रकरणी न्यायलयाने ‘ट्विटर किलर’ला दोषी ठरवले आहे. ताकाहिरो शिरीषी (वय 29) असे आरोपीचे नाव असून त्याच्या घरात मानवी अवशेष आणि हाडे सापडल्यानंतर 2017 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात बुधवारी या ट्विटर किलरने हत्या केल्याची कबूली दिली आहे. शिरीषीने हत्या केलेल्या लोकांनी सोशल मिडीयावर आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची मरण्याची इच्छा असल्याने शिरीषीवरील हत्येचा आरोप वगळण्यात यावा, अशी मागणी त्याच्या वकिलाने केली होती.

हत्या केल्यानंतर शिरीषी मृतांच्या शरीराचे काही भाग घरातच कूल बॉक्समध्ये ठेवत होता. आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या 15 ते 26 वर्षांमधील 9 जणांची हत्या केल्याचा आरोप शिरीषीवर आहे. त्यांनी सोशल मिडायाद्वारे आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिरीषीने त्यांच्याशी ऑनलाईनद्वारे संपर्क साधत तुमच्या आत्महत्येच्या योजनेत मी तुम्हाला मदत करू शकतो. तसेच मी तुमच्यासोबत मरण्यासाही तयार आहे, असे सांगितले होते. त्याच्या ट्विटरवरील संदेशामुळे त्याला ट्विटर किलर म्हणण्यात आले. त्याने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे जपानच्या कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षाही होऊ शकते.

आपल्या अशीलाने पीडितांच्या सहमतीने त्यांची हत्या केली आहे. त्यामुळे त्यांना फाशीऐवजी सात वर्षांची शिक्षा देण्यात यावी, असे शिरीषीच्या वकिलांनी म्हटले आहे. आपण आपल्या वकिलांशी सहमत नसल्याचे शिरीषीने म्हटले आहे. आपण हत्या केलेल्या कोणाचीही सहमती घेतली नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. तीन वर्षांपूर्वी एक 23 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर संशयावरून पोलिसांनी शिरीषीला अटक केली होती. त्या मुलीने ट्विटरवर आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या मुलीच्या भावाने ट्विटरवर संशयास्पद पोस्ट दिसल्याने शिरीषीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी शिरीषीला अटक करून त्याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरात 9 मानवी शरीराचे अवशेष 240 हाडे, कूलर्स आणि कूल बॉक्स आढळले. ही हाडे आणि मानवी अवशेष मांजराच्या विष्ठेने झाकण्यात आले होते. त्याच्या घरात आठ महिला आणि एका पुरुषाचे अवशेष आढळले. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करून त्याती कसून चौकशी करण्यात आली. तसेच हत्येचे हे वेगळे प्रकरण असल्याने त्याची पाच महिने मानसीक तपासणीही करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे. जपानी कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या