राज्यात महायुती सरकारच्या विरोधात जनता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असून, महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे रयतेचे राज्य हा विश्वास जनतेला असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ किल्ले शिवनेरी येथे यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तुषार थोरात, सुरज वाजगे, अनंतराव चौगुले, शरद लेंडे, बाजीराव ढोले, राजश्री बोरकर, मोहित ढमाले, अंकुश आमले, जितेंद्र बिडवई यांच्यासह पक्षाचे जिह्यातील पदाधिकारी, यावेळी उपस्थित होते.
सामान्य जनतेच्या मनात विश्वास संपादन करण्यासाठी तसेच या सरकारला शेवटचा धक्का देण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदारांना 50 कोटी रुपये देऊन महाराष्ट्रात आमदार खरेदी करण्यात आले, ईडी सीबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडण्यात आले असा आरोप देशमुख यांनी केला. खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख, भारती शेवाळे, सत्यशील शेरकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.