पूरस्थितीवर विशेष अधिवेशन बोलवा, जयंत पाटील यांची मागणी

राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्राद्वारे केली आहे.

यंदाच्या वर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवडय़ापासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतीचा चिखल झाला आहे. शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. पूरग्रस्त भागात अनेक लोक अडकले आहेत, तर काही लोकांनी जीव गमावला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी पूरस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले आहे.