राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद नाहीत – जयंत पाटील

1031
jayant-patil

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत परंतु भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास वेगळा कसा व्हायला हवा याचा विचार सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिली.

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे गेल्यानंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी या प्रकरणाची जाहीर वाच्यता करण्याऐवजी जे काही म्हणणं आहे, विचार आहेत ते मांडले जातील किंवा त्याची चर्चा मुख्यमंत्र्याकडे केली जाईल असेही स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या