
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज सक्तवसूली संचलनालयाने तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. चौकशीनंतर जयंत पाटील जेव्हा ईडी कार्यालयातून बाहेर पडले त्यावेळी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती. हे कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या नावाच्या घोषणा देत होते.
ईडीने मला पाठवलेल्या नोटीस नुसार आज मी ईडी कार्यालयात उपस्थित राहिलो. जवळपास दहा तास मी ईडी कार्यालयात होतो. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. त्याबाबत मी संपूर्ण सहकार्य केलेले आहे.
भारतीय संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे. pic.twitter.com/j81BgxW4xV
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 22, 2023
जयंत पाटील यांनी ईडी चौकशीनंतर ट्विट करत त्या बाबत माहिती दिली. ”ईडीने मला पाठवलेल्या नोटीस नुसार आज मी ईडी कार्यालयात उपस्थित राहिलो. जवळपास दहा तास मी ईडी कार्यालयात होतो. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. त्याबाबत मी संपूर्ण सहकार्य केलेले आहे. भारतीय संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे” , असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. या ट्विट सोबत त्यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यातील एक फोटोही शेअर केला आहे.




























































